Skip to main content

आठवण


आठवण येते कधी मला 
अन गालावर खुदकन खळी पडते !
तर कधी हस्त हस्त 
डोळी   माझ्या पाणी आणते!!

गर्दीत रडून सुद्धा ती
एकांतात आभास देते !
अन  एकांतात गेलो तरी मला 
नाही कधी एकटे सोडते !!

डोळे  बंद केल्यावरचे 
नवे विश्व दाखवून देते!
अन उघड्या डोळ्यानाही 
ती कधी धुंद करून टाकते!!

 दूर लोटायचा प्रयत्न केला 
तर अधिकच जवळ येऊन बसते!
जवळ तिला बळावले तर मात्र
कोपऱ्यात कुठे दडून बसते !!

हीच आहे ती माझी  मैत्रीण 
नेहमी साथ देणारी !
आगंतुक असली तरी
हवी- हवीशी वाटणारी !! 
महेंद्र धाडवे 


Comments

Popular posts from this blog

हौसले की पतवार

तारुण्याच्या उंबरठ्यावर

पाहताच तिला डोळ्या  समोर,  उचांक गाठतो आनंदाचा ! होते मन उदास माझे ,  ती नज़रेआड़ असताना! सांगा  हो मला कोणीतरी,  खरच हे प्रेम की फक्त मनाचा  गोंधळ ? "आज तिच्याशी  मी बोलनारच" ,  ठरवले असते मनाने पक्के ! सुरवात करते बोलायल ती   अन अबोल होते मन माझे  !!   सांगा  हो मला कोणीतरी,  खरच हे प्रेम की फक्त मनाचा  गोंधळ ? नाही ती miss universe ,    नाही ती अप्सरा  पण, कोणास माहित कोणास ठाऊक , हूर हूर  होते मनात माझ्या  तिच्या सोबत बसतांना!!   सांगा  हो मला कोणीतरी,  खरच हे प्रेम की फक्त मनाचा  गोंधळ ? काय   म्हनू मी याला  प्रेम , आकर्षण  की फक्त मनाचा  गोंधळ ? यक्ष प्रश्न पडला मला या  तारुण्याच्या   उंबरठ्यावर  सांगा  हो मला कोणीतरी,  खरच हे प्रेम की फक्त मनाचा  गोंधळ ? महेंद्र धाडवे 

साथ मला तू देशील का?