Posts

कालिदास सारखा मेघांबरोबर निरोपही पाठवला असता नभांतून पण संपून गेले सारेच ढग तुझ्या गहिवारल्या गहरया डोळ्यात मोघली(मुघलकालीन) चित्रासारख चितारलाही असतं तुझं चित्रं पण परमेश्वरणी सार्‍याच रेषा संपून टाकल्या तुझी लय चितारतांना बनभट्टासारख्या सुंदर सुंदर उपमही दिल्या अस्त्या तुला शब्दातून पण सुंदर हा शब्दच मुळी  शब्दकोशाणा तुझ्या कडे पासून गवसलाय आता रात्रीचि भैरवी तेवढी गायची राहली पण ती मी काशी गाऊ कारण सारे स्वर स्वर्‍बद्ध आहेत तुझाच कोमल गळ्यात ती मी कशी गाऊ ?
Image

रिंगटोन

Image

kana

Image

मागणी

बऱ्याच   दिवसां  नंतर आज , कविता मी लिहिणार आहे.... लेखणी तर मीच धरेल  कवितेची ओळ तू बनशील का?  ह्या दूर जाणाऱ्या मार्गी  एकलाच मी निघालो आहे .... पाय तर माझे असणार आहे पायवाट तू होशील का? इतके वर्ष भटकणाऱ्या मनाला  आज कुठे थामायाचे आहे.... सागराप्रमाणे आहे ते तू किनारा बनून त्याला थांबवशील का?  पुरे झाले हे आता  माझे  असे कोड्यात बोलणे मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलंय  तू सुद्धा फक्त माझीचं होशील का????? महेंद्र धाडवे 

आठवण

आठवण येते कधी मला  अन गालावर खुदकन खळी पडते ! तर कधी हस्त हस्त  डोळी   माझ्या पाणी आणते!! गर्दीत रडून सुद्धा ती एकांतात आभास देते ! अन  एकांतात गेलो तरी मला  नाही कधी एकटे सोडते !! डोळे  बंद केल्यावरचे  नवे विश्व दाखवून देते! अन उघड्या डोळ्यानाही  ती कधी धुंद करून टाकते!!  दूर लोटायचा प्रयत्न केला  तर अधिकच जवळ येऊन बसते! जवळ तिला बळावले तर मात्र कोपऱ्यात कुठे दडून बसते !! हीच आहे ती माझी  मैत्रीण  नेहमी साथ देणारी ! आगंतुक असली तरी हवी- हवीशी वाटणारी !!  महेंद्र धाडवे