Skip to main content

मागणी


बऱ्याच   दिवसां  नंतर आज ,
कविता मी लिहिणार आहे....
लेखणी तर मीच धरेल 
कवितेची ओळ तू बनशील का? 


ह्या दूर जाणाऱ्या मार्गी 
एकलाच मी निघालो आहे ....
पाय तर माझे असणार आहे
पायवाट तू होशील का?


इतके वर्ष भटकणाऱ्या मनाला 
आज कुठे थामायाचे आहे....
सागराप्रमाणे आहे ते
तू किनारा बनून त्याला थांबवशील का? 


पुरे झाले हे आता 
माझे  असे कोड्यात बोलणे
मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलंय 
तू सुद्धा फक्त माझीचं होशील का?????
महेंद्र धाडवे 

Comments

Popular posts from this blog

हौसले की पतवार

तारुण्याच्या उंबरठ्यावर

पाहताच तिला डोळ्या  समोर,  उचांक गाठतो आनंदाचा ! होते मन उदास माझे ,  ती नज़रेआड़ असताना! सांगा  हो मला कोणीतरी,  खरच हे प्रेम की फक्त मनाचा  गोंधळ ? "आज तिच्याशी  मी बोलनारच" ,  ठरवले असते मनाने पक्के ! सुरवात करते बोलायल ती   अन अबोल होते मन माझे  !!   सांगा  हो मला कोणीतरी,  खरच हे प्रेम की फक्त मनाचा  गोंधळ ? नाही ती miss universe ,    नाही ती अप्सरा  पण, कोणास माहित कोणास ठाऊक , हूर हूर  होते मनात माझ्या  तिच्या सोबत बसतांना!!   सांगा  हो मला कोणीतरी,  खरच हे प्रेम की फक्त मनाचा  गोंधळ ? काय   म्हनू मी याला  प्रेम , आकर्षण  की फक्त मनाचा  गोंधळ ? यक्ष प्रश्न पडला मला या  तारुण्याच्या   उंबरठ्यावर  सांगा  हो मला कोणीतरी,  खरच हे प्रेम की फक्त मनाचा  गोंधळ ? महेंद्र धाडवे 

साथ मला तू देशील का?