Skip to main content

तारुण्याच्या उंबरठ्यावर

पाहताच तिला डोळ्या  समोर, 
उचांक गाठतो आनंदाचा !
होते मन उदास माझे , 
ती नज़रेआड़ असताना!
सांगा  हो मला कोणीतरी, 
खरच हे प्रेम की फक्त मनाचा  गोंधळ ?



"आज तिच्याशी  मी बोलनारच" , 
ठरवले असते मनाने पक्के !
सुरवात करते बोलायल ती  
अन अबोल होते मन माझे  !!  
सांगा  हो मला कोणीतरी, 
खरच हे प्रेम की फक्त मनाचा  गोंधळ ?

नाही ती miss universe ,  
 नाही ती अप्सरा 
पण, कोणास माहित कोणास ठाऊक ,
हूर हूर  होते मनात माझ्या 
तिच्या सोबत बसतांना!!  
सांगा  हो मला कोणीतरी, 
खरच हे प्रेम की फक्त मनाचा  गोंधळ ?



काय   म्हनू मी याला 
प्रेम , आकर्षण की फक्त मनाचा  गोंधळ?
यक्ष प्रश्न पडला मला
या  तारुण्याच्या  उंबरठ्यावर 
सांगा  हो मला कोणीतरी, 
खरच हे प्रेम की फक्त मनाचा  गोंधळ ?


महेंद्र धाडवे 


Comments

Popular posts from this blog

हौसले की पतवार

साथ मला तू देशील का?