पाहताच तिला डोळ्या समोर, उचांक गाठतो आनंदाचा ! होते मन उदास माझे , ती नज़रेआड़ असताना! सांगा हो मला कोणीतरी, खरच हे प्रेम की फक्त मनाचा गोंधळ ? "आज तिच्याशी मी बोलनारच" , ठरवले असते मनाने पक्के ! सुरवात करते बोलायल ती अन अबोल होते मन माझे !! सांगा हो मला कोणीतरी, खरच हे प्रेम की फक्त मनाचा गोंधळ ? नाही ती miss universe , नाही ती अप्सरा पण, कोणास माहित कोणास ठाऊक , हूर हूर होते मनात माझ्या तिच्या सोबत बसतांना!! सांगा हो मला कोणीतरी, खरच हे प्रेम की फक्त मनाचा गोंधळ ? काय म्हनू मी याला प्रेम , आकर्षण की फक्त मनाचा गोंधळ ? यक्ष प्रश्न पडला मला या तारुण्याच्या उंबरठ्यावर सांगा हो मला कोणीतरी, खरच हे प्रेम की फक्त मनाचा गोंधळ ? महेंद्र धाडवे
Comments
Post a Comment